वॉशिंग्टन- पेनिसिल्विनिया विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रमुखपदी भारतीय वंशांचे रोबोटिक्स तज्ज्ञ विजय कुमार यांची नियुक्ती झाली आहे. एक जुलैपासून ते पदभार सांभाळणार आहेत.
पेनसिल्विनियाच्या अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुखपदी विजय कुमार
स्वयंचलित रोबोट बनविण्यासाठी ते जगविख्यात आहेत असे विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकात त्यांच्याबाबत लिहिले आहे. २०१२-१४ दरम्यान अभ्यास रजेवर असताना त्यांनी व्हाईट हाऊसच्या रोबोटिक्स आणि सायबर फिजीकल सिस्टमच्या उपसंचालक पदाची जबाबदारी सांभाळली होती. डीन पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी प्रशासन आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.