चिनी मिन्झू ने आणले एम वन नोट

m1-note
शिओमी, ओप्पो, जिओमी,विवो यासारख्या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी भारतात त्यांची पावले चांगलीच रोवल्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मिन्झू या स्मार्टफोन कंपनीनेही भारतात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तसे संकेत कंपनीने सोशल नेटवर्कच्या माध्यमातून दिले आहेत. कंपनी त्यांचा एम वन नोट स्मार्टफोन भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन एप्रिलमध्ये भारतात येईल असे समजते.विशेष म्हणजे त्याची किंमत ७ हजार रूपये आहे.

हा स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये डिेसेंबरमध्ये लाँच केला आहे. ५.५ इंची स्क्रीनचा हा फॅब्लेट फुल एचडी स्क्रीनसह आहे. १६ आणि ३२ जीबी व्हेरिएंटमध्ये तो उपलब्ध असून त्याला १३ एमपीचा रिअर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम, अँड्राईड वर आधारित फ्लायमे ओएस अशी फिचर्स दिली गेली आहेत. हा स्मार्टफोन हिरवा, गुलाबी, निळा, पिवळा आणि पांढरा अशा पाच रंगात आहे.

Leave a Comment