म्यानमारकडे रवाना झाले सोलर इम्पल्स -२

solar
वाराणसी- आज वाराणसी येथून इंधनाशिवाय चालणारे जगातील एकमेव सोलार इम्पल्स या विमानाने उड्डाण घेतले असून ते म्यानमारला रवाना झाले आहे. त्यानंतर हे विमान चीनच्या चोंगछिंग, नानचिंगला जाणार आहे.

काल रात्री सोलर इम्पल्स वाराणसी येथील लालबहादुर शास्त्री विमानतळावर पोहचले होते. वाराणसीमध्ये येऊन गंगा नदीहून फेरी मारून स्वच्छता आणि स्वच्छ ऊर्जेचा संदेश सोलार इम्पल्स देणार होते. परंतु, अहमदाबादहून निघण्यासाठी उशीर झाल्याने ते रद्द करावे लागले. विमानतळाचे संचालक एस. के. मलिक यांनी सोलार इम्पल्सच्या वैमानिकांचे आणि सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले होते.

Leave a Comment