अस्वच्छ रुग्णालये ठरली अर्भकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण

wateraid
लंडन : स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस विकसनशील देशांतील गंभीर होत चालला असून, केवळ अस्वच्छतेमुळे या देशांमध्ये दरवर्षी पाच लाख नवजात अर्भकांचा मृत्यू होतो. तसेच या देशांतील एक तृतीयांश रुग्णालयांमध्ये एकतर पुरेसे कर्मचारी नाहीत तसेच बहुतांश रुग्णांना हात धुण्यासाठी साबणही मिळत नाही. तब्बल ४० टक्के रुग्णालयांना पाण्याचा वेगळा स्रोतच उपलब्ध नसल्याचे ‘सॅनिटेशन चॅरिटी वॉटरएड’ आणि जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. दरवर्षी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो.

केवळ स्वच्छ पाणी उपलब्ध न झाल्याने पाच लाख नवजात अर्भकांना एक महिना पूर्ण होण्याच्या आतच प्राण गमवावे लागतात. केवळ चांगली स्वच्छता ठेवली तरी त्यांचे प्राण वाचू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित डॉक्टरांचे म्हणणे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैद्यकीय पथकांनी यासाठी ५४ विकसनशील देशांमधील रुग्णालयांच्या स्थितीची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये त्यांना बहुतांश रुग्णालयांमधील अवस्था दयनीय असल्याचे दिसून आले. बहुसंख्य रुग्णालयांकडे स्वतंत्र अशी पाणीपुरवठ्याची यंत्रणाच नसल्याचे दिसून आले. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, हैती, मलावी, टांझानिया आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय असल्याचे दिसून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment