५ रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार १० रुपयाला

ticket
मुंबई – आजवर रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट पाच रुपयला मिळत होते पण आता तेच तिकीट १० रुपयाला मिळणार आहे. १ एप्रिल २०१५ पासून हे दर लागू होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

१ एप्रिलपासून लागू होणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकीटाची नोंद प्रवाशांच्या नातेवाईकांनी घेऊन नियमानुसार तिकीट खरेदी करावे, असे आवाहन रेल्वेच्यावतीने करण्यात आले आहेत. तिकीट काढून देण्यासाठी नवीन एसटीएम आणि यूटीएस या मशीन वापरण्यात येणार आहेत. विना प्लॅटफॉर्म तिकीट प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर विनातिकीट समजून कारवाई करण्यात येणार आहे.

रॅली, यात्रा किंवा उत्सवादरम्यान प्लॅटफॉर्मवर अधिक गर्दी होते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment