या कालीमातेला दिला जातो नूडल्सचा नैवेद्य

chini-kal;i
भारत हा अद्भूत देश आहे. या देशाइतकी विविधता अन्य देशात मिळणे कठीण. धर्म आस्था हेच जीवन मानणार्‍या नागरिकांचा हा देश. येथे जितके धर्म तितक्या वेगवेगळ्या श्रद्धा, तितक्या पुजा अर्चेच्या वेगळ्या प्रथाही पाळल्या जातात. कोणत्याही गावात गेलात तरी कोपर्‍याकोपर्‍यावर देवळे, मंदिरे, मशीदी दिसणारच. अगदी कांही नाही तरी म्हसोबा, पीरांचे दगड दिसणारच.

कोलकात्यापासून जवळ असलेल्या टंगरा भागातही असेच एक काली मंदिर आहे. तिला चिनी कालीमातेचे मंदिर असेच म्हणतात. या भागात चिनी लोकांची खूप मोठी वस्ती आहे. एका झाडाखाली शेंदूर लावलेला दगड होता त्यावरच हे मंदिर उभारले गेले आहे आणि आता ते मोठे प्रस्थ झाले आहे. येथे मंदिरात दररोज सकाळ सायंकाळ पूजा, आरती करण्यासाठी ब्राह्मण पुजारी येतो मात्र देवीला नैवद्यात नूडल्स, चॉपसुई, भात आणि चिनी पद्धतीने केलेल्या भाज्या असतात. दरारोज अनेक चिनी या मातेचे श्रद्धेने दर्शन घेतात. कधी कोलकात्याला गेलात तर या चिनी कालीमातेच्या मंदिराला जरूर भेट द्या.

Leave a Comment