ह्युंदाईची नवीन अॅक्टीव्ह स्पोर्ट कार

hyundai
नवी दिल्ली – जगातील प्रमुख कार निर्माता कंपनी ह्युंदाईने दिल्लीतील मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय ग्राहकांसाठी खास करुन बनविलेल्या आय २० – अॅक्टीव्ह ही नवीन स्पोर्ट कारचे थाटात सादरीकरण करण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेलवरही चालू शकणारे मॉडेल या कारच्या निमित्ताने कंपनीने सुरू केले आहे. या गाडीची किंमत ६.३८ लाख रु ते ८.८९ लाख रुपयांच्या (दिल्ली शोरुम) दरम्यान आहे.

ह्युंदाईचे ऑटोमोबाईलचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक बी. एस. सेवो यांनी सांगितले की, भारतीय बाजाराशी बांधिलकी जपण्याच्या उद्देश्यातून आणि खास करुन भारतीय ग्राहकांसाठी कंपनीने आय २० अॅक्टीव्ह या मॉडलचे निर्माण केले आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या गाडीला स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. या सेंगमेंटच्या गाड्यांमध्ये पहिल्यांदाच आधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत.

कंपनीच्या मते आय २० मॉडल हे कंपनीचे भारतातील ट्रेंड सेटर मॉडल आहे. ह्युंदाईचे भारतात वितरण वाढविण्यासाठी या कारमध्ये आधुनिक फिचर ग्राहकांना पुरवण्यात आले आहेत. आय २० अॅक्टीव्हची डिजाईन आणि इंजिन क्षमता खास करुन तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी बनविण्यात आले आहे.