सोनीचा एक्सपिरीया ई फोर लाँच

xperia
सोनीने त्यांचा नवा मिडरेंज हँडसेट एक्सपिरीया ई फोर भारतात सादर केला असून सध्या याचे ड्युएल सिम व्हेरिएंट उपलब्ध केले गेले आहे. त्याची किंमत १२४९९ रूपये असून या स्मार्टफोनची बॅटरी दोन दिवसांचा टॉकटाईम देते असा कंपनीचा दावा आहे. या फोनच्या बॅटरीला स्टॅमिना व अल्ट्रा स्टॅमिना असे दोन मोड दिले गेले आहेत. त्यामुळे बॅटरी कमी झाली तर अनावश्यक अॅप व बॅकग्राऊंड विंडोज आपोआप बंद होतात व परिणामी पॉवर सेव्ह होते.

या स्मार्टफोनला अँड्राईड किटकॅट ४.४.४ ओएस, पाच इंची एलईडी डिस्प्ले, १ जीबी रॅम, ५ एमपीचा रियर कॅमेरा, सेल्फी आणि व्हीडीओ कॉलिगसाठी २ एमपीचा कॅमेरा, ८ जीबी मेमरी, कार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, कर्व्ह एज, स्क्रॅच प्रूफ स्क्रीन, डायमंड कट अॅल्युमिनियम पॉवर बटण अशी अन्य फिचर्स दिली गेली आहेत. सध्या हा फोन फक्त काळ्या व पांढर्‍या रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment