‘याहू’च्या ई-मेलसाठी गरज नाही पासवर्डची!

yahoo
मुंबई: ‘याहू’ने ई-मेल अकाऊंट अधिक सुरक्षित करण्यासाठी नवी कल्पना आणली असून तुम्हाला यापुढे तुमच्या याहूच्या ईमेलचा पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही लॉग-इन कराल, तेव्हा कंपनी तुम्हाला प्रत्येकवेळी नवा कोड देईल. त्या कोडनुसार तुम्हाला लॉग-इन करता येणार आहे. हा कोड तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल.

याहूच्या ही नव्या संकल्पने ‘ऑन डिमांड पासवर्ड’ असे नाव असून युजर्सचे अकाऊंट या नव्या कल्पनेमुळे अधिक सुरक्षित होईल, असा दावा कंपनीने केला आहे.

अनेक वेळा ई-मेल अकाऊंट ओपन करणे किंवा मेल चेक करणे पासवर्ड विसरल्यामुळे करता येत नाही. पासवर्डची ही कटकट मिटवण्यासाठी याहूने ही ‘ऑन डिमांड पासवर्ड’ ही योजना आणल्यामुळे आता यापुढे पासवर्ड लक्षात ठेवण्याची कटकट मिटणार आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ‘वन टाईम पासवर्ड’ उपलब्ध होईल. याहू या वर्षाअखेरपर्यंत जगभरात सर्वत्र युजर्ससाठी ही सेवा सुरु करणार आहे.

Leave a Comment