भारत संकेतस्थळावरील मजकूरावर निर्बंध घालण्यात पहिल्या स्थानावर

facebook
नवी दिल्ली – जुलै – डिसेंबर २०१४ दरम्यान भारत सरकारच्या आदेशानुसार सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने सर्वात जास्त ५,८३२ मजकूर आपल्या संकेतस्थळावरुन हटविले आहेत. यामध्ये धर्मविरोधी मजकूर आणि भड़काऊ भाषण सामिल आहेत.

वर दिलेल्या अवधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर हटावणे किंवा त्यावर बंदी घालण्याचे आदेश सर्वात जास्त आदेश भारत सरकारकडून मिळाले असल्याचे फेसबुकने सांगितले आहे. कॅलिफोर्नियामधील मुख्यालय असलेल्या या कंपनीचे म्हणणे आहे की जुलै ते डिसेंबर २०१४ च्या दरम्यान ५,८३२ सामग्रीला प्रतिबंधित केले आहे.

कंपनीने सांगितले की देशाची सुरक्षा एजन्सी आणि इंडिया कम्प्यूटर एमरजेंसी रिस्पाँस टीमच्या सुचनेनंतर सरकारने हे पाऊल उचलले होते. फेसबुकने आपल्या अहवालात हा खुलासा केला आहे. त्यानुसार भारतानंतर तुर्कीचा नंबर लागतो त्यांनी फेसबूकवरील ३,६२४ मजकूरांवर बंदी आणली आहे. या यादीमध्ये जर्मनीकडून ६०, रशियाकडून ५५ आणि पाकिस्तान सरकारकडून ५४ मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment