ब्लॅकबेरी, सॅमसंग, आयबीएमचा संयुक्त सिक्युटॅब्लेट सादर

secutab
मोबाईल उपकरणांची रेंज वाढविण्यासाठी ब्लॅकबेरीने हाय सिक्युरिटी टॅब्लेट लाँच करत असल्याची घोषणा केली असून हा टॅब सॅमसंग आणि आयबीएम यांच्या सहकार्याने विकसित केला गेला आहे. सिक्युटॅब्लेट ब्लॅकबेरीच्या सिक्युस्मार्टने जर्मनीतील टेकफेयर सिबिट २०१५ मध्ये सादर केला आहे.

गॅजेट जगतातील ३ बड्या कंपन्या ब्लॅकबेरी, सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स आणि इंटरनॅशनल बिझिनेस मशीन कार्प( आयबीएम) यांनी संयुक्तरित्या हा टॅब तयार केला असून तो सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब १०.५ प्रमाणेच आहे. वास्तविक हा टॅब सिक्यूस्मार्ट कंपनीने तयार केला आहे मात्र ही कंपनीच ब्लॅकबेरीने गतवर्षी विकत घेतली आहे. या टॅबमध्ये जर एखादे मालवेअर इन्स्टॉल झाले तर टॅबमधील संवेदनशील डेटा सुरक्षित राहतो. हे तंत्रज्ञान आयबीएमने पुरविले आहे. या संयुक्त टॅबचा फायदा तिन्हीही सहयोगी कंपन्यांना होणार आहे.

Leave a Comment