मोबाईलप्रेमींसाठी एचटीसीचा नवा स्मार्टफोन

htc
मुंबई : भारतात नुकताच एचटीसीने डिझायर ८२०एस हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. भारतीय बाजारपेठेत एचटीसी डिझायरची किंमत २५ हजार ५०० रुपये ते २४ हजार ८९० रुपये यादरम्यान असणार आहे.

डिझायर ८२०एस हा ८२० या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे अॅडव्हान्स मॉडेल असून यामध्ये १.७ GHz च्या ६४ बीट ऑक्टा-कोअर प्रोसेसरसोबतच ५.५ इंचची स्क्रीन असणार आहे. याशिवाय यात १३ मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

एचटीसी डिझायरची वैशिष्ट्य
एचडी स्क्रीन ५.५ इंच, डिस्प्ले ७२० x १२८० पिक्सेल, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १३ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा, फोनमध्ये २ जीबीचा रॅम आणि १६ जीबीची इंटर्नल मेमरी, १२८ जीबीचे मेमरी एसडी कार्ड जोडले जाऊ शकते, २६००mAh ची बॅटरी, ऑपरेटिंग सिस्टिम ४.४ किटकॅट, स्टिरिओ ऑडिओ जॅक, वाय-फाय, ४ जी कनेक्टिव्हिटी, १५० mbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड

Leave a Comment