‘अॅपल’सारखे घड्याळ अवघ्या १८९० रुपयांत !

u-wathch
बीजिंग : ‘अॅपल वॉ़च’सारखा दिसणारे घड्याळ चीनमध्ये तयार केला आहे. चीनच्या शेन्झॉन प्रांतात ‘अॅपल वॉच’सारखे दिसणाऱ्या स्मार्टवॉचची जोरदार विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे अॅपल वॉचची चिनी आवृत्ती ओरिजिनल प्रोडक्टपेक्षा तब्बल दहा पटींनी स्वस्त असून या चीनी ‘वॉच’ची किंमत फक्त १८९० एवढी आहे.

शेंजेनच्या हॉकियांगबी मॉलमध्ये ‘यू वॉच’ आणि ‘डी वॉच’ नावाची घड्याळे विकली जात आहेत. या घड्याळावर कुठेही मूळ ‘अॅपल’ कंपनीचा लोगो नाही. मात्र या घड्याळाचा लूक अगदी ‘अॅपल वॉच’सारखाच आहे. चीनमध्ये मिळणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये कॉल, टेक्स्ट मेसेजेस, म्युझिक अशा अनेक सुविधाही आहेत. मात्र यामध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप ‘वी चॅट’ आणि ‘क्यूक्यू’ नाहीत. काही टेक्नोसॅव्हींचे मत आहे की, चीनमध्ये विक्री होणाऱ्या या घड्याळांचा लूक केवळ ‘अॅपल’च्या वॉचसारखे आहे. मात्र ही घड्याळं ‘अॅपल वॉच’पेक्षा खूप कमी फीचर्स आणि क्वालिटीमध्येही फरक आहे.

Leave a Comment