स्वीडीश फर्निचर कंपनी इकी ने त्यांची नवी फर्निचर श्रृँखला सादर केली असून त्यात स्मार्टफोन चार्ज करू शकतील असे टेबल लँप्स, टेबल टॉप्स सादर करण्यात आले आहेत. कंपनीच्या मॅनेजर जेनेट स्कीलमोज यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने केलेल्या संशोधनात असे आढळले की लोकांना फोनसाठी केबल वापरणे तितकेचे सोयीचे जात नाही आणि त्यांना ते आवडतही नाही. त्यामुळे कंपनीने क्यूआय तंत्रज्ञानाचा वापर करून असे फर्निचर बनविले आहे जे वायरलेस चार्जिंगची सुविधा युजरला देऊ शकते.
स्मार्टफोन चार्ज करतील टेबल लँप, टेबल टॉप
या तंत्रज्ञानात वायरलेस चार्जिंग स्टेशन नाईट स्टँड, टेबल, डेस्क, लँपमध्ये दिले गेले आहे. एप्रिलच्या सुरवातीला हे फर्निचर नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्ये बाजारात आणले जाणार आहे. हे फर्निचर सहज परवडणारे आहे मात्र आयफोन चार्जिंगसाठी त्याचा उपयोग होऊ शकणार नाही. सॅमसंग गॅलेक्सी, नोकिया लुमिया, गुगल नेक्सस , शार्प अशा ८० हून अधिक स्मार्टफोनचे चार्जिंग मात्र या फर्निचरच्या सहाय्याने करता येणार आहे.