वैद्यकीय क्षेत्रातील ऐतिहासिक संशोधन; जगातील पहिले लिंग प्रत्यारोपण यशस्वी

surgery
केपटाउन : जगातील पहिली ‘पेनिस ट्रान्सप्लान्ट’ (लिंग प्रत्यारोपण) सर्जरी दक्षिण आफ्रिकेत यशस्वी झाली. टिगरबर्ग हॉस्पिटलमध्ये स्टेलनबोश युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी केलेली सर्जरी पूर्णपणे यशस्वी झाल्याची अधिकृत माहिती दिली. तीन वर्षांपूर्वी खतना करताना २१ वर्षीय रुग्णाचे लिंग कापले गेले होते. या सर्जरीसाठी एका आजारी रुग्णाने आपले लिंग दान केले होते.

मागील वर्षी ११ डिसेंबर रोजी रुग्णावर पेनिस ट्रान्सप्लान्ट सर्जरी करण्यात आली होती. या सर्जरीसाठी डॉक्टरांनी सलग नऊ तास अश्रक परिश्रम घेतले होते. सर्जरीनंतर तीन महिने रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. रूग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. त्याची मूत्र नलिका आणि प्रजनन यंत्रणा व्यवस्थीत कार्य करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांनी सांगितले की, पेनिस ट्रान्सप्लान्ट सर्जरीसाठी सगळ्यात आधी एक पेनिस डोनर आवश्यक असतो. सुदैवाने एका रुग्णाचे पेनिस उपलब्ध झाले. ट्रान्सप्लान्टविषयी वेगवेगळ्या टप्प्यात परीक्षण करण्यात आले. सन २०१०मध्ये या सर्जरीच्या नियोजनास प्रारंभ झाला होता. एक व्यापक संशोधनानंतर प्रा. वान डर मर्व आणि त्यांची सर्जिकल टीमने पहिला फेशियल ट्रान्सप्लांट तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. या तंत्रज्ञानाचा वापर करून दुस-यांदा करण्यात आला. रुग्णाच्या नशीबाने यात साथ दिली. इतिहासात पहिल्यांदा पेनिस ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वी झाली.

Leave a Comment