घातक ई-सिगारेटच्या जाहिराती

cigaratte
वॉशिंग्टन – नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ई-सिगारेटच्या जाहिरातीही घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना धूम्रपानाला हा पर्याय उपलब्ध असल्याचे समजत असल्याने त्यांना पर्याय मिळतो. परिणामी, धूम्रपान बंद न करता व्यसनी लोक ई-सिगारेट्सकडे वळत आहेत.

८०० पेक्षा जास्त नियमित धूम्रपान करणार्‍या लोकांचा पेनसेल्वेनिया विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील संशोधक एरिन के. मलोनी आणि जोसेफ कॅपेला यांनी अभ्यास केला. त्याशिवाय, धूम्रपान सोडल्यानंतर ई-सिगारेटचा पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांनी पुन्हा धूम्रपान सुरू केल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. ई-सिगारेट्‌सच्या सुमारे डझनभर जाहिराती एरिन आणि जोसेफ यांनी एकत्र आणल्या. संशोधनासाठी त्यांनी नियमित किंवा क्वचित धूम्रपान करणार्‍यांसह हे व्यसन सोडलेल्यांचाही अभ्यास केला. या लोकांना ई-सिगारेटच्या जाहिराती वारंवार दाखविण्यात आल्या. जाहिराती पाहिल्यानंतर, त्यांना धूम्रपान करण्याची तीव्र इच्छा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. ‘हेल्थ कम्युनिकेशन’ नावाच्या आरोग्यविषयक नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment