गुरूच्या चंद्रावर कधीकाळी अथांग होता समुद्र

jupiter
केप कार्निव्हल – आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था नासाच्या वैज्ञानिकांनी सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या चंद्रावर कधीकाळी अथांग समुद्र होता. गॅनिमीड असे या चंद्राचे नाव असून, हा समुद्र आता पूर्णपणे गोठला आहे, यावर शिक्कामोर्तब केले. महाकाय अंतराळ दुर्बिणीचा वापर करून वैज्ञानिकांनी या समुद्राचा शोध घेतला आहे. भविष्यात या ग्रहावर जीवसृष्टी होऊ शकते, असा विश्‍वासही नासाला आहे.

१९९५ ते २००३ या काळात नासाच्या वैज्ञानिकांनी गुरू आणि त्याच्या चंद्रांचा अभ्यास केला. यासाठी गॅलिलिओ यानाचीही मदत घेण्यात आली. आपल्या सौरमालिकेत असलेल्या या सर्वात मोठ्या चंद्राचे रहस्य आता उलगडले आहे. गुरूच्या चंद्रावर समुद्र होता, याचे पुरेसे पुरावे आम्हाला मिळाले आहेत, असे नासाच्या वैज्ञानिकांनी या नव्या अभ्यासाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.

आपल्या पृथ्वीप्रमाणेच गॅनिमीडच्या पृष्ठभागावरही द्रवरूप लोहपदार्थ आहेत. यातूनच चुंबकीय क्षेत्राची निर्मिती झाली. त्यातच गुरूचे स्वत:चेही चुंबकीय क्षेत्र असल्याने हे दोन्ही क्षेत्र एकमेकांना आकर्षित करीत असते. या प्रभावामुळे गुरूच्या उत्तर आणि दक्षिण धृवांच्या सभोवताल विलक्षण असे प्रकाशमान दृश्य तयार झाले आहे. गुरूच्या परिक्रमेमुळे त्याचे चुंबकीय क्षेत्रही बदलत गेले आणि परिणामी गॅनिमीडचे प्रकाशमान क्षेत्रही बदलत गेले. वैज्ञानिकांनी कॉम्प्युटर मॉडेल्सचा उपयोग केला, तेव्हा त्यांना असे जाणवले की, क्षारयुक्त आणि चुंबकीय आकर्षणामुळे प्रकाशमान असा समुद्र या चंद्रावर आहे.

गुरू हा प्रकाशित ग्रहच आहे, ज्याचे चुंबकीय क्षेत्र त्याच्या परिक्रमेमुळे बदलत असते, असे जर्मनच्या कोलोंग विद्यापीठातील खगोल शास्त्रज्ञ जोएचिम सौर यांनी सांगितले. गॅनिमीडच्या प्रकाशमान क्षेत्रावर परिणाम करणारे आणखीही काही घटक आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी नासाने शंभरावर कॉम्प्युटर्स मॉडेल्सचा वापर केला. हा अभ्यास वारंवार करण्यात आला. अल्ट्राव्हायलेट दुर्बिणीतूनही दोन्ही धृवांवरील प्रकाशमान क्षेत्राचे निरीक्षण करण्यात आले आणि शेवटी समुद्राच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले.

Leave a Comment