सॅमसंगचा रफ अॅन्ड टफ गॅलेक्सी एक्सकव्हर थ्री

xcover
सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी मालिकेतील सर्वात रफ आणि टफ स्मार्टफोन एक्सकव्हर थ्री पुढच्या आठवडयात होत असलेल्या सेबिट इंडस्ट्रीयल एक्स्पो मध्ये सादर करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन आत्तापर्यतच्या फोनमध्ये सर्वात दणकट असून तो हातातून खाली पडला तरी कोणतेही नुकसान होणार नाहीच पण तो पाणी, शॉक, धूळ, थर्मल, क्षार, पाऊस यांच्यापासून फुल प्रूफ आहे. या फोनसाठी एक्सकव्हर की दिली गेली आहे.

या फोनचे वैशिष्ठ म्हणजे तो १ मीटर खोल पाण्यात अर्धा तास ठेवला तरीही त्याला कोणतीही बाधा येत नाहीच पण याला दिलेल्या कॅमेर्‍यामुळे पाण्यात असतानाही तो फोटो काढू शकतो. फोनला ४.५ इंची एफव्हीजीए डिस्प्ले. अँड्राईड किटकॅट ४.४, ती ५.० लॉलीपॉप मध्ये अपग्रेड करण्याची सुविधा, १.५ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्डने वाढविता येण्याची सोय, थ्रीजी, फोर जी, ब्ल्यू टूथ, वायफाय कनेक्टीव्हीटी, ५ एमपीचा कॅमेरा एलईडी फ्लॅशसह, सेल्फीसाठी २ एमपीच्या कॅमेरा अशी फिचर्स दिली गेली आहेत. फोनची किंमत २७५ युरो म्हणजे १८ हजार रूपये आहे.

Leave a Comment