मर्सिडीजची पुढच्या नऊ महिन्यात १२ नवी मॉडेल

mercedesse
मसिर्डीज बेंझने भारतीय बाजारात त्यांचे स्थान अधिक मजबूत केले आहे.२०१५ सालात कंपनीने भारतीय बाजारात १५ नवीन मॉडेल्स आणण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते, त्यानुसार ३ मॉडेल्स आली आहेत आणि पुढील नऊ महिन्यात १२ नवी मॉडेल्स सादर केली जाणार आहेत.

कंपनीचे सीईओ ईबरहार्ड कर्न या संदर्भात माहिती देताना म्हणाले , भारतीय ग्राहकांची कॉम्पॅक्ट कारला अधिक पसंती आहे हे लक्षात आल्यानंतर कंपनीने कॉम्पॅक्ट मॉडेल्स बाजारात आणली आहेत. सध्या कंपनीने मेट्रो शहरांबरोबरच जमशेदपूर, कानपूर, जयपूर अशा १५ शहरांवर विशेष ध्यान केंद्रीत केले आहे. या शहरातून कंपनी शो रूम्स आणि विक्री केंद्रे सुरू करत आहे.

बुधवारी कंपनीने बी क्लास श्रेणीतील नवी कॉम्पॅक्ट कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारात सादर केली आहे. त्याचंया किमती पेट्रोलसाठी २७.९५ लाखांपासून तर डिझेलसाठी २८.९५ लाखांपासून आहेत.

Leave a Comment