नव्या फोनच्या लाँचिगसाठी शाओमीची अनोखी शक्कल

xaiomi
नवी दिल्ली : आपल्या नव्या फोनच्या लाँचिगसाठी एक नवी शक्कल शाओमी कंपनीने लढविली असून आता शाओमीने एक इव्हेंट इन्व्हिटेशन पाठविणे सुरू केले आहे. शाओमीने दिल्लीमध्ये एका इव्हेंटचे आयोजन केले होते.

टेकिंग टू इट नेक्स्ट लेवल या नावाने हे इन्व्हिटेशन तयार करण्यात आले आहे. शाओमीने आपले प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर एक प्रश्न विचारला आहे. कोणते प्रोडक्ट लाँच केले जाईल, असे तुम्हाला काय वाटते ? असा प्रश्न विचारण्यात आला. तसेच त्यावर प्रतिक्रिया देखील मागविण्यात आल्या आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

शाओमीचे व्हाईस प्रेसिडेंट हुगो बारा आणि शाओमची भारतातील प्रमुख मनू जैन हे या कार्यक्रमात शाओमी आपल्या रेडमी सीरिजमधील नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. यासाठी कंपनीने आपल्या पझल कॉन्टेस्टमध्ये स्नॅपडड्ढॅगन, क्लिक चार्ज, एक्सपेंडेबल अशा शब्दांचा वापर केला होता. यावरून असाच अंदाज लावण्यात येत आहे की, शीओमी रेड मी २ लाँच करू शकते.

Leave a Comment