गुगलचे लंडनमध्ये पहिले स्टोअर

google
लंडन : आपले पहिलेच स्टोअर गुगलने लंडनमध्ये उघडले आहे. या शॉपमध्ये ग्राहकांसाठी अनेक आकर्षणे ठेवण्यात आली असून अशा प्रकारची आणखी दोन स्टोअर गुगल लवकरच उघडणार आहे.

गुगलच्या अमेरिकेतील मार्केटिंग विभागाचे संचालक जेम्स इलियास याबाबत बोलताना म्हणाले की, ‘लंडनमधील करीज् पीसी वर्ल्डस्टोअरमध्ये अशा प्रकारचे जगातील पहिलेच स्टोअर सुरू करताना आम्हाला अविश्वसनीय आनंद होत आहे. या स्टोअरमध्ये लोकांनी खेळावे, प्रयोग करावेत आणि शिकावे असे आम्हाला वाटते. विविध प्रकारच्या ऑनलाईन जगतातील अविश्वसनीय आणि वेगवान डिव्हायसेसही इथे उपलब्ध असतील’ असेही ते पुढे म्हणाले. लंडनमधील करीज् पीसी वल्र्ड स्टोअरमध्ये अ‍ॅपल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग यांसारख्या अन्य काही कंपन्यांचे स्टोअर आहेत. आता त्यामध्ये गुगलच्या अनोख्या स्टोअरची भर पडणार आहे.

Leave a Comment