गोल घड्याळाच्या आकाराचा स्मार्टफोन

runcible
अॅपल स्मार्टवॉच बाजारात धूम माजवत असतानाच मोनोहमने विशेष आकाराचा स्मार्टफोन लाँच केला आहे. गोल घड्याळासारखाच दिसणार्या या स्मार्टफोनचे नामकरण रनसिबल असे करण्यात आले आहे. कंपनीचा सीईओ जॉर्ज एरिओन याच्या मते गोल स्मार्ट पॉकेट वॉचच्या आकारातील हा फोन युनिक आहे. त्यात सर्व फोनफिचर्स आहेतच पण युजरला मनमुराद मौज करण्याची संधीही आहे.

एखाद्या तबकडीसारखा हा फोन भासतो. त्याच्या मागचा भाग चिनार वृक्षाच्या लाकडापासून बनविला गेला आहे. मात्र प्रत्यक्षात बाजारात हा फोन येईल तेव्हा त्यात टीन, कॉपर, ब्रास अथवा अन्य लाकडाचा उपयोगही केला जाईल. हा फोन फायरफॉक्स ओएसवर चालतो. याला दिल्या गेलेल्या कॅमेर्यातून गोल फोटो आणि व्हीडीओ काढता येतात. हा फोन फिरवूनच फोकस अथवा झूम करता येते. टचस्क्रीन ची सुविधा असलेला हा फोन यूएसबी पोर्टसह आहे. त्याची किंमत अजून गुलदस्त्यातच ठेवली गेली आहे.

Leave a Comment