अॅपल वॉच मध्ये 10.09 ची वेळ का?

watch
कोणत्याही कंपन्यांची घड्याळे त्यांच्या डिस्प्लेमध्ये बहुदा 10.10 ही वेळ दाखवित असतात. नव्यानेच बाजारात दाखल झालेल्या अॅपल स्मार्टवॉच ने मात्र 10.09 ही वेळ दाखविली आहे. आणि त्यामागे खास कारणही आहे. प्रथम स्टीव्ह जॉब्जने अशी अगोदरची वेळ दाखविण्याची सुरवात करताना आयफोनच्या प्रमोशनल फोटोत 9.41 ची वेळ दाखविली होती. आताचा सीईओ टीम कुकने घड्याळात 10.09 ची वेळ दाखविताना अॅपल सर्वांच्या पुढे असल्याचा संदेश दिला आहे.

वेगवेगळ्या घड्याळ कंपन्या प्रमोशनल टाईमबाबत अतिशय सजग असतात. रोलेल्सने 10.10.31, टॅगह्युमरने 10.10.37, बेल एंड रोजने 10.10.10 तर टायमेक्सने 10.09.38 या वेळा दर्शविल्या होत्या. अॅपलने टायमेक्सच्याही आपण पुढे आहोत हे दाखविण्यासाठी 10.09.00 ते 10.09.33 अशा वेळा दर्शविल्या आहेत.

असेही सांगितले जात असे की 10.10 मिनिटांनी जपानच्या हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब पडला आणि विध्वंसाची वेळ म्हणून घड्याळ कंपन्यांनी 10.10 ही वेळ दर्शविण्याची सुरवात केली. मात्र खरे कारण असे आहे की या वेळी घड्याळ्याचे काटे अशा स्थितीत असतात की घड्याळ्याच्या डायलवरील कंपनीचा लोगो व अन्य अक्षरे व्यवस्थित दिसू शकतात.

Leave a Comment