अहमदाबादमध्ये दाखल सोलर इम्पल्स-२

solar-impluse
अहमदाबाद : विश्व परिक्रमेवर निघालेले सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमान भारतात दाखल झाले असून, अहमदाबाद येथे या विमानाचे जंगी स्वागत करण्यात आले. सोलर इम्पल्स-२ असे या विमानाचे नाव आहे.

या विश्वपरिक्रमावर निघालेले सौर विमानाचे स्वीत्झर्लंडमधील पायलट बट्रेंड पिकार्ड आणि आंद्रे बोर्शबर्ग यांच्या मते भारतातील १.२ अब्ज लोकांनी जागतिक पर्यावरणाचा विचार करून नविकरणीय ऊर्जेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. त्यासाठीच ही ख-या अर्थाने विश्वपरिक्रमा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे विमान मंगळवारी मस्कट येथून निघाले होते.

सोलर इम्पल्स-२ हे विमान तयार करण्यासाठी विविध देशांची परवानगी घेण्यात आली. या विमानावर १७ हजारांपेक्षा अधिक सौर सेल लावण्यात आले आहेत. हे सेलच विमानाची बॅटरी रिचार्ज करू शकतात. हे विमान प्रतितास ४५ कि.मी. या वेगाने धावू शकते. यासंदर्भात माहिती देताना पिकार्ड म्हणाले की, येथून हे विमान वाराणसीला जाईल. त्यानंतर प्रशांत महासागर ओलांडून आपल्या ३५ हजार कि.मी.च्या प्रवासादरम्यान चीन आणि म्यानमारसह १२ देशांत हे विमान थांबविण्यात येईल.

Leave a Comment