बुलेट ट्रेनमधील जॉबसाठी कडक प्रशिक्षण

bullet
जगभरात एअरलाईन्समध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणार्‍यांना कडक परिक्षा द्याव्या लागतात याची आपल्याला माहिती असते. मात्र चीनमध्ये हायस्पीड बुलेट ट्रेनमध्ये अडेंटंट म्हणून काम करू इच्छीणार्‍यांनाही निवडीपासूनच कडक परिक्षांना आणि प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. हजारो जण अर्ज करतात मात्र त्यातून फारच थोड्यांची प्रत्यक्षात निवड होते. त्यानंतर कडक प्रशिक्षणातून त्यांना जावे लागते आणि मगच हा जॉब करता येतो.

नव्या बुलेट ट्रेनसाठी सध्या ५ विविध प्रकारच्या जॉबसाठी असेच १५०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. शेडोंग प्रांतातील जिनान शहरात जियोटोंग विद्यापीठात हे प्रशिक्षण दिले जात आहे. अटेंडंट च्या पोस्टसाठी ९० जणांची निवड झाली आहे.निवड होताता बॉडी, उंची, वजन यांचे कडक नियम आहेत तसेच इतरही अनेक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यांना डान्सचाही सराव करावा लागतो. कोर्स पूर्ण झाल्यावर अगोदर हायस्पीड ट्रेनमध्ये इंटर्नशीप करावी लागते आणि मगच पक्की नोकरी मिळते.

बुलेट ट्रेन चालकांसाठी तर आणखी कडक प्रशिक्षण आहे. त्यांचे डोळे, कान, हृदय आणि मानसिक स्वास्थ यांच्या काटेखोर तपासण्या होतात. कडक शारीरिक प्रशिक्षण घ्यावे लागते कारण नेहमीच्या ट्रेनच्या तुलनेत बुलेट ट्रेन चालकांना फारच वेगळ्या परिस्थितीत काम करावे लागत असते असे समजते.

Leave a Comment