हार्वर्ड विद्यापीठाने केली लालूंची मुलीची पोल-खोल

lalu
पाटणा – एका फोटोमुळे लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारती अडचणीत आली असून मिसा भारती यांनी दावा केला होता, की हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी त्यांना निमंत्रित केले होते. मात्र विद्यापीठाने त्यांचा हा दावा खोटा ठरविला आहे. मिसा यांनी हार्वर्ड विद्यापीठातील फोटो सोशल साइटवर अपलोड केले होते. त्यावर विद्यापीठाने मिसा यांना भाषणासाठी नाही तर श्रोता म्हणून निमंत्रीत केल्याचे स्पष्ट केले आहे.

सात मार्च रोजी हार्वर्ड विद्यापीठात ‘इंडिया कॉन्फ्रन्स’ आयोजित करण्यात आली होती. विद्यापीठात आयोजित या परिषदेचे संयोजक रजत सेठी यांनी म्हटले आहे, की मिसा यांना श्रोता म्हणून निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाच्या वक्त्या नव्हत्या, किंवा वक्त्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. परिषदेच्या आयोजकांच्या लक्षात आले, की मिसा यांनी सोशल साइटवर (फेसबुक आणि ट्विटर) परिषदेच्या ठिकाणचे काही फोटो अपलोड केले आहेत. संयोजकांनी या फोटोंवर आक्षेप घेतला आहे. परिषदेसाठी निमंत्रीत वक्त्यांची यादी देखील साइटवर पाहाता येते. हार्वर्ड विद्यापीठातील कॉन्फ्रन्स संपल्यानंतर मिसा यांनी मंचावर उभे राहुन अनेक फोटो घेतले. त्यांनी सोशल साइट्सवर अपलोड केलेले हे फोटो पाहून वृत्तपत्रांनी मिसा यांनी हॉर्वर्ड विद्यापीठात भाषण केल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या.

मिसा भारती या अजूनही अमेरिकेत आहेत. त्यांनी या फोटो वादावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मिसा भारती या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेल्याचे आरजेडी सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment