बहुप्रतिक्षित अॅपल वॉच आले

watch
सॅनफ्रान्सिस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात अॅपल ने त्यांचे बहुचर्चित अॅपल वॉच सादर केले असून त्यांच्या किंमती २२ हजारांपासून ६ लाख रूपयांपर्यंत आहेत.(३४९ डॉलर्स ते १० हजार डॉलर्स) १०एप्रिलपासून या वॉचसाठीचे बुकींग सुरू होणार आहे आणि ती विक्रीसाठी २४ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहेत. सध्या ९ देशात ही विक्री सुरू केली जाणार असून त्यात भारताचा समावेश नाही.

हे वॉच दोन साईजमध्ये अणि तीन व्हेरीएंटमध्ये आहे. ३८ व ४२ मीमी साईज आणि अॅपल वॉच, वॉच एडिशन आणि वॉच स्पोर्टस अशा तीन प्रकारात आहे. या वॉचसाठी अनेक फिचर्स दिली गेली आहे. अॅपल वॉच आणि वॉच एडिशनसाठी स्क्रीन तूटू नये म्हणून सफायर क्रिस्टलचा वापर केला गेला आहे तर वॉच स्पोर्टससाठी आयन एक्स ग्लास लावली गेली आहे.

वॉच युजर त्यांची महत्त्वाची माहिती स्क्रीनच्या फ्रंटवर ठेवू शकणार आहेत. हे वॉच आयफोनशी सरळ संपर्कात असेल व त्यामुळे आयफोनवर आलेले नोटिफिकेशन घड्याळ्याच्या स्क्रीनवर डिस्प्ले होऊ शकणार आहे. यात इनबिल्ट स्पीकर व माईक आहेत यामुळे युजर फोनही करू शकतील.या वॉचसाठी डिजिटल टच सुविधा आहे तसेच त्यातून स्केच, हार्टबीटसुद्धा पाठविता येऊ शकणार आहेत. मात्र ज्याच्याकडे ते पाठवायचे त्याच्याकडेही अॅपल वॉच असणे आवश्यक आहे. यात अनेक फिटनेस फिचर्सही दिल्या गेल्या आहेत. थर्ड पार्टी अॅप, म्युझिक साठी शाझम अॅप, हॉटेलमध्ये चेकइन आणि खोलीचे लॉक उघडण्यासाठी हॉटेल अॅप,एअरपोर्टजवळ पोहोचताच बोर्डींग पास घड्याळच्या स्क्रीनवर डिस्प्ले होण्याची सुविधा अशीही फिचर्स यात आहेत. याची बॅटरी १८ तास चालेल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment