पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे

neuclear
वॉशिंग्टन – अॅटोमिक सायन्टिस्ट या शिकागो विद्यापीठातून चालणाऱ्या वार्तापत्रातून पाकिस्तानकडे १२० अण्वस्त्रे आहेत तर भारताकडे ११० असल्याचे सांगण्यात आले असून विद्यापीठातील अणुशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या इन्फोग्राफिक्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

अण्वस्त्रे असणाऱ्या नऊ देशांच्या अण्वस्त्रांचा इतिहास एका न्युक्लियर नोटबुकमध्ये सचित्र देण्यात आला आहे. रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांकडे ५,००० अण्वस्त्रे आहेत. फ्रान्सकडे ३००, चीनकडे २५०, इंग्लडकडे २२५, इस्त्राइलकडे ८० अण्वस्त्रे आहेत. उत्तर कोरियाने अलीकडे केलेल्या चाचण्यांचा उल्लेख नोटबुकमध्ये आहे. अण्वस्त्रांचा इतिहास, त्यांची क्षमता, त्याबाबत त्या देशाला आलेले अनुभव आणि इतर देशांच्या अण्वस्त्रांसोबत त्यांचा तुलनात्मक अभ्यास हंस क्रिस्टन्सेन आणि रॉबर्ट नॉरिस यांनी यात केला आहे.

Leave a Comment