नव्या अवतारात कालबाह्य झालेला ‘नोकिया ११००’ !

nokia
मुंबई: पुन्हा एकदा नव्या अवतारात जगातील सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यामुळे माहिती मिळाली की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो.

गीकबेंच बेचंमार्क रिझल्टद्वारे माहिती मिळाली आहे की, हा हँडसेट अँड्रॉइड ५.० लॉलीपॉपसह आणि यात क्वाडकोर मीडियाटेक (MT6582) प्रोसेसर लागलाय. नोकिया ११०० हँडसेटमध्ये ५१२ एमबी रॅम आहे.

नोकिया ११००, २००३मध्ये लॉन्च झाला होता. लॉन्च झाल्यानंतर लगेच हा फोन सर्वाधिक लोकप्रिय ठरला. हा फोन जगभरात २५ कोटी व्यक्तींनी वापरल्याचा दावा कंपनीनं केलाय. स्मार्टफोन आल्यानंतर हा हँडसेट मार्केटमधून गायब झाला. मात्र लवकरच नव्या रुपात येऊन पुन्हा एकदा धूम माजविण्यासाठी नोकिया ११०० तयार असेल.

Leave a Comment