आतापर्यंतचा मोटोरोलाचा सर्वात महागडा फोन

moto
नवी दिल्ली- आणखी एक स्मार्टफोन भारतात मोटोरोला मोबाईल कंपनीने लॉन्च केला असून ‘मोटोरोला मोटो टर्बो’ हा स्मार्टफोन सोमवारपासून ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ४१,९९९ रुपये एवढी या मोटो टर्बो फोनची किंमत आहे.

मोटोरोला कंपनीने याआधी ‘मोटो मॅक्स’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने ‘मोटो मॅक्स’ या फोनपेक्षाही आधिक चांगले फिचर्स ‘मोटो टर्बो’ या फोनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे हा फोन महाग असला तरी युझर्ससाठी खूप फायदाचा आहे.

या फोनची बुकिंग सुरू झाली असून फ्लीपकार्डवर या फोनच्या ऑर्डरसाठी एक पेज तयार करण्यात आले आहे. हा फोन मॅटेलिक काळा आणि लाल रंगामध्ये उपलब्ध आहे.

हा स्मार्टफोन आवघ्या १५ मिनिटांत चार्ज केला तर आठ तास चालू शकतो आणि पूर्ण चार्ज केला तर ४८ तास हा फोन चालू राहू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.

मोटोरोला मोटो टर्बोचे हे आहेत फिचर्स
» ५.२ इंच क्यूएचडी डिसप्ले » १४४०x२५६० पिक्सेल स्क्रिन रेझ्युलेशन » २.७ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर » ६४ जीबी इंटरनल मेमरी » २१ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश रेअर कॅमेरा » २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा » ३९०० एमएच बॅटरी

Leave a Comment