विश्व प्रदक्षिणेसाठी निघाले सौरउर्जेवर चालणारे विमान

solar-implase
अबूधाबी : आज सौरउर्जेवर चालणाऱ्या ‘सोलार इम्पल्स-२’ या विमानाचे उड्डाण झाले असून ‘सोलार इम्पल्स-२’ची विश्वप्रदक्षिणा यशस्वी झाल्यास सौरउर्जेवर चालणारा हे पहिले विमान ठरणार आहे. संयुक्त अरब आमिरातमध्ये ‘सोलार इम्पल्स-२’ची दोनच दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी झाल्यामुळे आज विश्वप्रदक्षिणेसाठी निघालेल्या ‘सोलार इम्पल्स-२’चे उड्डाण यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अबूधाबीमधून सुरु झालेला हा प्रवास म्यानमार, चीन, न्यूयॉर्कहून पुन्हा अबूधाबी असे असणार आहे. पाच महिन्यांच्या प्रवासात ‘सोलार इम्पल्स-२’ जगातील सर्व खंडांची सफर करणार आहे.