पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी होणार क्षमता चाचणी

student
पुणे – गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या शाळांना आता चाप बसणार असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या वयानुसार आणि इयत्तेनुसार आवश्यक त्या क्षमता ग्रहण केल्या आहेत का, याची पाहणी करण्यासाठी क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. बाहेरील संस्थेकडूनही ही चाचणी घेण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे शाळांना खोटे रिपोर्ट कार्डची संधीदेखील राहणार नाही.

शिक्षणविषयक धोरण ठरविण्यासाठी मुंबईत काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१५-१६) शाळांमध्ये या चाचण्या सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

Leave a Comment