महिंद्राचीही विनाड्रायव्हर कार येणार

mahindra
ड्रायव्हरच्या शिवाय चालणार्‍या कार बनविण्यासाठी गुगल, टेस्ला, बीएमडब्ल्यू, ऑडी या बड्या कार कंपन्यांनी सातत्याने काम सुरू ठेवले असतानाच भारताची वाहन उत्पादक कंपनी महिद्राही या स्पर्धेत उतरली आहे. महिंद्राची इलेक्ट्रीक कार उपकंपनी महिंद्र रेवा ने ब्रिटन आणि सिंगापूर मध्ये विनाड्रायव्हर कार संदर्भातले कांही कन्सेप्टस जमा केले असून त्यावर बंगलोर येथील कंपनीच्या संशोधन विकास केंद्रात काम सुरू केले आहे.

सिंगापूर आणि ब्रिटन सरकारकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या कारच्या टेस्ट सुरू केल्या जाणार असल्याचे समजते. कारच्या ट्रायल सुरू झाल्यावर प्रत्यक्षात कार बाजारात येण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतील असेही सांगितले जात आहे. कारच्या रोड टेस्ट ब्रिटन आणि सिंगापूर येथेच केल्या जाणार आहेत मात्र या कारसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर भारतातच बनविले जाणार आहे.रेवाच्या २० हजार इलेक्ट्रीक कार सध्या भारतीय रस्त्यांवर आहेत त्यांना १०० सेन्सर बसविले गेले असून त्यामार्फत डेटा कलेक्शन केले जात आहे असेही कंपनीतील वरीष्ठ सूत्रांकडून समजते. अर्थात ही ड्रायव्हरलेस कार भारतात गर्दी खूप असल्याने येथे विक्रीसाठी येईल वा नाही हे आत्ताच सांगता येत नाही.

Leave a Comment