भारतीय ग्राहकांना ‘अॅपल’चा धक्का

apple
नवी दिल्ली : तुम्हाला अॅपल फोन विकत घ्यायचा असेल तर ही बातमी वाचून तुमची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. कारण अॅपलने भारतात आपल्या सगळ्याच आयफोनच्या रिटेल किंमतीत वाढ केली आहे.

अडीच हजार रुपयांनी आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस या मॉडेल्सच्या किंमतींमध्ये वाढ होईल. ‘आयफोन ६’चे ६४ जीबी आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत आता क्रमश: ६५,००० आणि ७४,००० रुपये असेल.

तर, १६ जीबीच्या ‘आयफोन ६ प्लस’च्या फोनची किंमत ६५ हजार रुपये असेल तर ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ७४ हजार रुपये आणि १२८ जीबीसाठी ८३,००० रुपये मोजावे लागतील.

जुन्या आयफोन मॉडल्सवरही या वाढलेल्या किंमतींचा प्रभाव दिसून येणार आहे. ८ जीबीच्या ‘आयफोन ५सी’ची किंमत ३३,५०० रुपये असेल. आयफोन ५चे १६ जीबीचे मॉडेल ४७ हजार रुपयांना उपलब्ध होईल तर ३२ जीबीच्या आयफोनचे मॉडेल ५१,५०० रुपयांना मिळेल.

Leave a Comment