अॅपलचे टेक्नॉलॉजी सेंटर भारतात येण्याचे संकेत

apple
आयफोन आणि आयपॅड सारखी जगप्रसिद्ध उत्पादने तयार करणार्याु अॅपल इंकने त्यांचे टेक्नॉलॉची डेव्हलपमेंट सेंटर भारतात सुरू करण्यासंबंधी विचार सुरू केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे प्रत्यक्षात घडले तर एकाअर्थाने सॉफ्टवेअर जगतात भारताच्या या क्षेत्रातील ताकदीवर मोहोर उठणार आहे असे जाणकारांचे मत आहे.

या बाबत अॅपल ऑनलाईन रिेटेलरचे उपाध्यक्ष बॉब कपबिन्स यांनी चर्चेला सुरवात केली असल्याचेही समजते. बॉब टारगेट रिटेल आणि डेल्टा एअरलाईन्सचे माजी एक्झिक्युटिव्ह आहेत आणि त्यांना भारतीय बाजाराची चांगली जाण आहे. अॅपलने या पूर्वी २००६ साली सपोर्ट सेंटर भारतात सुरू केले होते मात्र तेव्हा सर्व्हिस क्वालिटी समाधानकारक नसल्याने ते बंदही केले होते. आज मात्र परिस्थिती बदलली असून भारतात ई कॉमर्स आणि रिटेल व्यवसायात अनेक तज्ञ इंजिनिअर काम करत आहेत. इतकेच नव्हे तर वॉलमार्ट, अॅमेझॉन सारख्य नेक्स्ट जनरेशन कंपन्यांसाठी कोड लिहित आहेत. भारतीय रिटेल स्टार्टअपही या तज्ञांच्या मदतीने आपली वेगळी ओळख जगात मिर्माण करत आहेत असे अॅपलमधील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

अॅपलने त्यांचे सपोर्ट सेंटर भारतात बंद केले होते तरी आजही येथील व्हेंडॉरबरोबर अॅपल काम करत आहे. त्यामुळेच आपले टेक्नॉलॉजी डेव्हलमेंट सेंटर भारतात सुरू करण्याबाबत कंपनी गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. हे सेंटर मुख्यत्वे बंगलोर येथे सुरू केले जाईल असेही संकेत दिले जात आहेत.

Leave a Comment