लवकरच पंतप्रधान कार्यालयाचे मोबाइल अॅप

pmo
नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे मोबाइल अॅप विकसित करण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांकडून कल्पना मागवण्यात आल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी अॅपची कल्पना ‘नॅसकॉम’च्या कार्यक्रमात बोलताना मांडली होती.

‘mygov.in’ या वेबसाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी गूगलचे सहकार्य घेतले जाणार आहे. येत्या तीन महिन्यात ही स्पर्धा घेतली जाणार असून ती 3 टप्प्यात होणार आहे. तीन महिन्यांतर जे सर्वोत्कृष्ट अॅप असेल त्याचे पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण केले जाणार आहे. अॅप स्पर्धेच्या विजेत्याला गूगलच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट देण्याची संधी मिळणार आहे.
पीएमओसाठी अॅप विकसित करण्याची स्पर्धा भारतातील सर्व नागरिकांसाठी खुली असणार आहे. मात्र स्पर्धकाचे 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी MyGov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे. तीनही टप्प्यातील स्पर्धांसाठी वेगवेगळे तज्ज्ञ परीक्षक असणार आहेत.

Leave a Comment