आरोग्य मंत्रालय साजरा करणार ‘सुरक्षित मातृत्व दिन’

women's-day
नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय ८ मार्च २०१५ हा आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या आरोग्याची आपली बांधिलकी दर्शविण्यासाठी ‘सुरक्षित मातृत्व दिन’ म्हणून साजरा करणार आहे, केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली.

तसेच ८ ते १० मार्च २०१५ दरम्यान देशभरात महिलांच्या आरोग्यासंदर्भात एक मोहिम राबविण्यात येईल व त्यासंबंधी विविध कार्यक्रम आयोजिण्यात येतील अशीही माहिती त्यांनी दिली.

या तीन दिवसात सर्व सरकारी आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये येथे येणाऱ्या महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यांचे छातीचा कॅन्सर व मानेचा कॅन्सर यासाठी परीक्षण केले जाईल. प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतरची काळजी, महिला-बाल रक्षण कार्डाचे वाटप इ. कार्यक्रम विनामूल्य घेतले जातील. याशिवाय, राज्यातील प्रत्येक गटातील एक ‘आशा’ कार्यकर्ताचा तिच्या महिला सबलीकरण व सामूदायिक आरोग्य या क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव केला जाणार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment