जिओनीचा ईलाईफ एस ७ सादर

gioony
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी जिओनीने बार्सिलोना येथे सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांचा जगातील सर्वाधिक सडपातळ ई लाईफ एस ७ सादर केला आहे. या फोनची किंमत ३९९ युरो म्हणजे २४२०० रूपये असून भारतात हा फोन ३ एप्रिलला लाँच केला जाणार आहे.

या स्मार्टफोनसाठी डिझाईनला पूर्णपणे नवा लूक दिला असून रेल्वे ट्रॅकप्रमाणे तो यू शेपमध्ये आहे. अॅल्युमिनियम आणि मॅग्नेशियमच्या संयुगापासून त्याची बॉडी बनविली गेली आहे. ड्युअलसिम सह कंपनीचे एमिगो युआय आणि अँड्राईड ५.० लॉलिपॉप त्याला दिले गेले आहे.५.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, कॉर्निग गोरिल्ला ग्लास३, तीन जीबी रॅम, १३ एमपीचा ऑटोफोकस रियर शूटर कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, १६ जीबी इंटरनल मेमरी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. फोरजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, यूएसडी, एफ एम रेडिओ अशी कनेक्टीव्हीटी असलेल्या या स्मार्टफोनचे वजन आहे अवघे १२७ ग्रॅम.

Leave a Comment