अनोखे डिजिटल चलन- बिटकॉईन

bitcoin
जगातील प्रत्येक देशाचे कांही ना कांही चलन असतेच. त्यात नाणी, नोटा यांचा समावेश असतो. मात्र आता असेही चलन जगात रूढ होते आहे, ज्यात नोटांची छपाईही करावी लागत नाही आणि टांकसाळीत नाणीही पाडावी लागत नाहीत. त्याचे नांव आहे बिटकॉईन. हे एक डिजिटल स्वरूपाचे चलन असून इलेक्ट्रोनिक रूपात बनविले जाते आणि त्याच स्वरूपात वापरले जाते. विशेष म्हणजे आपण ऑनलाईन खरेदी करताना जसे रूपये, डॉलर्स वापरतो, तसेच हे बिटकॉईनही वापरू शकतो.

या चलनाची सर्वात खास बात म्हणजे हे चलन डिसेंट्रलाईज्ड आहे. म्हणजे ते कोणत्याच संस्थेच्या नियंत्रणाखाली नाही. हे चलन डिस्ट्रीब्यटिंग नेटवर्कमध्ये कंम्प्युटिंगच्या सहाय्याने डिजिटल प्रकारात माईन केले जाते. हेच नेटवर्क बिटकॉईनचे ट्रान्झॅक्शन प्रोसेस करते. याचाच अर्थ हे पेमेंट नेटवर्क आहे.

मोझिला फौंडेशनने बिटकॉईन स्वरूपात देणग्या स्विकारायला सुरवात केल्याची बातमी नुकतीच आली आहे. हे चलन छोट्याछोट्या भागात वाटता येते म्हणजे आपण जसे रूपया वापरताना त्याचा भाग म्हणून चार आणे, आठ आणे वापरतो तसेच. या चलनाचा दहा कोटीवा हिस्सा सातोशी नावाने ओळखला जातो. हे चलन शोधणारा सातोशी नाकामोटो याच्या नावावरून हे नांव दिले गेले आहे.

सातोशीला कुणाच्याच नियंत्रणाखाली नसलेले चलन बनवायचे होते. सातोशी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. त्याने हे चलन बनविले असून त्याच इलेक्ट्रोनिक ट्रान्स्फरच प्रामुख्याने होत असल्याने खर्च एकदमच कमी येतो आणि नोटा फाटणे, नाणी झिजणे यासारखे प्रकारही होत नाहीत.