आश्चर्य ! कोंबडीच्या अंड्याची तब्बल ४६ हजारांना विक्री

egg
लंडन : सर्वांनीच कोंबडीचे अंडे पाहिले आहे. परंतु आतापर्यंत कोणी गोल गरगरीत कोंबडीचे अंडे पाहिले नव्हते. परंतु हा चमत्कार लंडनमध्ये झाला आहे. येथे कोंबडीचे गोल अंडे मिळाले आहे. त्याहून विशेष म्हणजे की, हे गोलाकृती अंडे तब्बल ४८० पौंड म्हणजेच ४६ हजार रुपयांना विकले गेले आहे. याआधी जगात कोंबडीच्या गोलाकृती अंड्यांचा लिलाव ९० पौडांना झाला होता. लंडनच्या एसेक्समधील किम ब्राऊटन यांच्या पिंग-पांगनामक कोंबडीने १७ फेब्रुवारीला एक अंडे दिले- जे पूर्णपणे गोलाकृती होते. दरम्यान किम ब्राऊटन यांच्या मित्राचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी या गोलाकृती अंड्यांचा ऑनलाईन लिलाव करून विक्री करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा हे अंडे ऑनलाईन लिलावास काढले तेव्हा ६४ लोकांनी बोली लावली. त्यामधून एका व्यक्तीने ४८० पौंड म्हणजेच ४६ हजार रुपयांना ते विकत घेतले. इंटरनेटवरून हे अंडे खरेदी करण्या-या व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Leave a Comment