आता पोलिस किलोमीटर एवजी धावा मीटरमध्ये

police
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस भरती होणा-या तरुणांना दिलासा दिला असून यासंदर्भात राज्यसरकारने मुंबई उच्च न्यायलयात स्पष्टीकरण दिले. कारण यापुढे पोलिस भरती प्रक्रियेत पुरुषांना १६०० मीटर, तर महिलांना ८०० मीटरच धावावे लागणार आहे. यापूर्वी पुरुषांना ५ किलोमीटर, तर महिलांना ३ किलोमीटर धावावे लागत होते.

गेल्या वर्षी पोलिस भरती दरम्यान पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यासंदर्भात ‘ऑल महाराष्ट्र ह्यूमन राइटस असोसिएशन’ च्या पत्राची उच्च न्यायालयाने दखल घेतली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सरकारने न्यायालयापुढे ही माहिती सादर केली.

न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पोलिस भरतीदरम्यान धावावे लागणारे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला.सरकारच्या या निर्णयावर न्यायालयाने समाधान व्यक्त केले.

Leave a Comment