ब्लॅकफोन दोन प्रायव्हेट सिक्युरिटी ओएस सह सादर

bkackfon
ब्लॅकफोन कंपनीने त्यांचा ब्लॅकफोन सिरीजमधील नवा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१५ मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने प्रायव्हेट ओएस व्ही१.१ सिक्युरिटीवर फोकस केला आहे तसेच ब्लॅकफोन वनची फिचर्स अपडेटही केली आहेत. याच कार्यक्रमात कंपनीने ब्लॅकफोन टॅब्लेट प्लस बाजारात आणत असल्याची घोषणाही केली आहे. हा टॅब्लेट या वर्षअखेरी बाजारात येईल.

ब्लॅकफोन दोन साठी अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम प्रायव्हेट ओएस व्ही १.१ वापरली गेली आहे. डिव्हाईसमध्ये विविध सेक्शनसाठी वेगवेगळे लॉगइन सुरक्षित केले गेले आहेत. म्हणजे युजर डॉक्युमेंट अॅप, कम्युनिकेशन अॅपसाठी वेगळे लॉगइन करून काम करू शकणार आहेत. याचा उपयोग डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी होऊ शकणार आहे. अन्य फिचर्समध्ये ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास, ३ जीबी रॅम, ४ जी तंत्रज्ञानाचा वापर, मायक्रो एसडी कार्ड सुविधा यांचा समावेश आहे.