रेल्वेप्रवाशांच्या सुविधेसाठी मोबाईल अॅप

app
नवी दिल्ली – रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. प्रवाशांना त्यांच्या तक्रारी या अॅपवर नोंदवता येणार आहेत. कुठल्याही तक्रारी येवू नये याकरिता रेल्वेचा प्रयत्न असतो. मात्र दररोज १० हजार ट्रेन्समधून जवळपास ३ कोटी प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे तक्रारी येणे सहाजिकच आहेत. हा विचार करुन तक्रारींचे निवारण योग्य प्रकारे होण्यासाठी या अॅपचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अॅप लॉन्च केल्यानंतर दिली. हे अॅप अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचल्यानंतर तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी मर्यादाही घालून दिली जाईल, असेही प्रभू म्हणाले.

www.indianrailways.gov.in या वेबसाईटवर प्रवासी तक्रार नोंदवू शकतात. तसेच www.coms.indianrailways.gov.in या URL वरुन मोबाईल अॅप डाऊनलोड करु शकतात. शिवाय ९७१७६३०९८२ या क्रमांकावर एसएमएस करुन प्रवासी तक्रार नोंदवू शकतात.

या अॅपविषयी माहिती देणारी जाहिरात सोशल मीडियासह विविध माध्यमांमध्ये केली जाईल, जेणेकरुन अॅप अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचेल. सध्या इंग्रजीमध्ये असलेले हे अॅप नंतर हिंदीसह इतर इतर प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. एकदा तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित तक्रारीस युनिक आयडी क्रमांक दिला जाईल जेणेकरुन तक्रारीवर किती काम झाले आहे हे कळणार आहे.
दरम्यान रेल्वे अर्थसंकल्प मांडल्यानंतर ३ दिवसानंतर रेल्वेमंत्र्यांनी तक्रारींसाठी म्हणजेच प्रवाशांच्या सुविधेसाठी अॅप सादर केल्याने त्याचे स्वागत होत आहे. हे पोर्टल सर्वोत्कृष्ट असेल असा दावा करणार नाही, मात्र या माध्यमातून प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करुन अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले आहेत.

Leave a Comment