मारूतीची ग्रँड व्हिटारा पुढच्या महिन्यात येणार

maruti
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्रँड व्हिटारा पुढच्या महिन्यात बाजारात आणत आहे. २०१४ च्या मॉडेलमध्ये कांही खास बदल करून हे नवे मॉडेल बाजारात आणले जात असल्याचे समजते. नवीन मॉडेल अधिक आरामदायी आणि स्टायलीश आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंट बाजारात आणल्या जात असून ही गाडी लिटरला २८ किमीचे मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.

व्हिटारा युकेतील सर्वात क्लीन कार म्हणून ओळखली जाते कारण या गाडीतून कार्बन डाय ऑक्साईडचे उर्त्सजन अगदी कमी प्रमाणात होते. नवीन मॉडेलमध्ये गाडीची कंफर्ट लेव्हल वाढविली गेली आहे. सीटमध्ये जादा जागा दिली गेली आहे. ही गाडी इको स्पोर्ट, रेनाचे डस्टर, फिएटची एव्हेच्युरा आणि टोयोटाच्या इंटि्रओज क्रॉसला स्पर्धा करेल. फेब्रुवारीत मारूतीच्या कार विक्रीत ८.७ टक्कयांची वाढ नोंदविली गेली असून या काळात कंपनीने १,१८,५५१ गाड्या विकल्या आहेत. गतवर्षी हे प्रमाण १,०९,१०४ इतके होते.

Leave a Comment