बालाजी सूर्यमंदिरात तुपाच्या विहीरी

surya-mandir
मध्यप्रदेशातील दतिया येथून १७ किमीवर असलेले उनाव येथील बालाजी सूर्यमंदिर निराळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. येथे अखंड ज्योत तेवत असते आणि त्यासाठी भाविक शुद्ध तुप दान म्हणून देतात. या दान आलेल्या तुपाने येथे जवळजवळ नऊ विहीरी भरल्या आहेत आणि आता नवीन येणारे तूप कुठे साठवायचे असा प्रश्न मंदिरातील पुजार्‍यांना पडला आहे.

हकीकत अशी की येथे भाविक मोठ्या संख्येने येतात ते प्रामुख्याने नवस बोलण्यासाठी. इच्छापूर्ती कुष्ठरोग, त्वचारोगातून बरे होण्यासाठी, संतान प्राप्ती, यशासाठी येथे भाविक शुद्ध तुप दान करण्याचा नवस बोलतात. मंदिर बांधल्यापासून म्हणजे सुमारे ४०० वर्षांपासून येथे शुद्ध तुपातील नंदादीप तेवता ठेवण्याची परंपरा आहे. दिवसाला येथे ८ किलो तूप नंदादिपासाठी लागते. मात्र भाविकांकडून २० किलोपेक्षा अधिक तूप दररोज गोळा होते. वसंत पंचमी, मकर संक्रांती, रंगपंचमी, एकादशी अशा विशेष पर्वांना खूपच मोठ्या प्रमाणावर भाविक येथे येतात आणि तूपाचे दान करतात.

हे तूप साठविसाठी पोलादाचे टँकरसारखे टँक तयार केले गेले आहेत. आत्तापर्यंत असे नऊ महाप्रचंड टँक तुपाने पूर्ण भरले आहेत. वर्षाला येथे सुमारे ८ टन तूप साठते त्याची व्यवस्था कशी करायची हाच मंदिरातील पुजार्‍यांसमोर मोठा प्रश्न आहे.

Leave a Comment