नोकरीच्या ठिकाणांना अमेरिकन तरुण देतात प्राधान्य

america
वॉशिंग्टन : कमी वयातच चांगल्या व्यवसायासह नोकरीच्या संधी अमेरिका, ब्रिटन, भारत, फ्रान्स, इटली, कॅनडा, चीन आदी देशांतील तरुण शोधू लागतात. या देशात त्यांना शालेय जीवनातच व्यावसायिक शिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांना करिअर निवडणे सोपे जाते. महाविद्यालयात त्यांना कॅम्पसमध्ये नोकरीच्या संधी येतात. पगाराचेही चांगली पॅकेजेस ऑफर केली जातात. असे असूनही अनेक तरुणांनी मोठ्या कंपन्यांतील नोकरीस नकार दर्शवल्याचे दिसून आले. कारण त्यांना उपनगराऐवजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नोकरी हवी असते.

चार-पाच वर्षांपूर्वी तरुण नोकरीसाठी मोठ्या शहरांऐवजी उपनगरांकडे जात होते. तेथे त्यांना ऑफरही चांगल्या मिळत होत्या. कंपन्यांनाही जागा मोठ्या मिळत असल्याने कंपन्यांची कार्यालये मोठमोठी आणि अत्याधुनिक असायची. काम करण्याचा उत्साह वाढावा म्हणून त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत असत. यामुळे तरुणवर्ग केवळ मोठ्या कंपन्यांतच नव्हे तर स्टोअर्स, ऑफिस पार्क किंवा प्लँट्समध्येही काम करण्यास तयार होत होते. पण आता तसे दिवस राहिले नाहीत.

अमेरिकेत तर उपनगरात असणा-या अव्वल दर्जाच्या कंपन्यांतील तरुण नोक-या सोडत आहेत. ते आता मोठ्या शहरात किंवा शहरातील चांगल्या ठिकाणी असलेल्या कंपन्यांत जात आहेत. कंपनीत नोकरी मिळत नसेल तर मॉल्स, स्टोअर्समध्ये नोकरी करण्यास तयार होत आहेत. तरुणांची प्राथमिकता बदलल्याने कंपन्यांनीसुद्धा आता आपली कार्यशैली बदलली आहे. ते उपनगराबरोबरच प्रमुख शहरांतही त्यांची कार्यालये काढण्यास तयार होत आहेत. त्यांना उपनगरात पुरेशा प्रमाणात योग्य माणसे मिळत नाहीत.

अमेरिकेच्या थिंक टँक सिटी ऑब्झव्र्हेटरीने अहवाल तयार केला असून उपनगरांच्या तुलनेत मोठ्या शहरांतच नोकरीच्या संधी वाढत असल्याचे म्हटले आहे. हा बदल गेल्या काही वर्षांतच आला आहे. अमेरिकेतील कार्यशक्तीत झालेले हे मोठे परिवर्तन आहे. तथापि, २००७ मध्ये वातावरण असे होते की, बहुतांश तरुण उपनगरातच काम करण्यास तयार होते. न्यूयॉर्क आणि सॅनफ्रान्सिस्को या शहरांत पुरेशा सोयी आहेत. रोजगारासाठी वातावरणही खूप चांगले आहे. शिकागो, न्यू ऑरलियन्स, ऑरलँडोमध्ये हेच पाहण्यास मिळत आहे. ज्या कंपनीचे कार्यालय मोठ्या शहरात आहे, तेथे व्यावसायिकता असते. तरुणांसाठीही मोठ्या संधी तेथे असतात.

Leave a Comment