अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरू

amarnath
बर्फानी बाबा अमरनाथाची यात्रा २ जुलै ते २९ ऑगस्ट या काळात होत असून त्यासाठीची यात्रेकरूंची नावनोंदणी सुरू झाली आहे. देशभर सोमवारपासून ही नोंदणी सुरू झाली आहे. जम्मू काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक आणि येस बँकेच्या देशभरातील ४३० शाखांमध्ये भाविकांना नोंदणी करता येणार आहे.

जम्मू काश्मीर बँकेने त्यांच्या ८७ शाखांतून २ लाख ९६ हजार १८० यात्रेकरूंची नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. पंजाब बँकेने देशभरातील त्यांच्या ३०५ शाखांतून नोंदणी सुरू केली आहे. नोंदणी करू इच्छीणार्‍या भाविकांना फिटनेस सर्टिफिकेट, चार पासपोर्ट साईज फोटो आणि ५० रू. शुल्क भरावे लागणार आहे.

Leave a Comment