द ट्रान्झिशन- हवेत उडणारी कार

transition
अमेरिकेच्या बोस्टन येथील टेर्राफुजिया कंपनीने हवेत उडणारी कार बाजारात आणण्याची तयारी सुरू केली असून २०१६ मध्ये ही कार बाजारात आणण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. वाहतूक कोंडीने त्रासलेल्या नागरिकांसाठी ही कार वरदान ठरेल असाही कंपनीचा दावा आहे. बाजारात येणारे ऊडत्या कारचे हे पहिलेच मॉडेल असेल.

या कारचे नामकरण कंपनीने द ट्रान्झिशन असे केले आहे. या कारला तुम्ही फक्त कुठे जायचे ते सांगायचे. कांही सेकंदात ती विमानासारखी आकाशात उडेल आणि तुम्हाला हव्या त्या ठिकाणी अलगद नेऊन पोहोचवेल. यासाठी कारला ६०० एचपीची दोन इलेक्ट्रीक मोटर पॉडस दिली गेली आहेत. कार स्टार्ट करताच ही पॉडस कार हवेत उचलतात आणि पॉडस पुढे वळतात. ज्या ठिकाणी उतरायचे तेथे पोहोचताच पुन्हा ती मागे वळतात आणि कारमध्ये फिट होऊन कार लँड होते. हे एक प्रकारचे खासगी विमानच आहे.

कारचे इंजिन रिचार्ज करण्यासाठी ३०० एचपीचे इंजिन दिले गेले आहे. कार २०० मेगाहर्टझच्या गतीने ५०० मैलांपर्यंत जाऊ शकते. कार्ल डेट्रीच यांनी ही कार तयार केली असून त्यामुळे खासगी वाहन क्षेत्रात आमुलाग्र बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. कमी वेळात इच्छीत स्थळी पोहोचणे यामुळे कार मालकांना सहज शक्य होईल असेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment