गोगोरो – स्मार्ट स्कूटर बाजारात येतेय

gogoro
तैपे च्या कंपनीने जगातील पहिली स्मार्टस्कूटर या वर्षात बाजारात उतरविण्याची तयारी सुरू केली असून या स्मार्टस्कूटरचे नामकरण गोगोरो असे केले गेले आहे. दिसायला अत्यंत आकर्षक अशी ही स्कूटर खास शहरी वाहतुकींसाठी बनविली गेली आहे. गर्दीतही प्रवास अतिशय सुलभ करण्यास ती सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

स्कूटर वजनाला हलकी म्हणजे ११२ किलोचीच असली तरी तिचे फिनिशिंग कमालीचे आहे. शून्य ते ५० किमीचा स्पीड ती केवळ ४ सेकंदात घेऊ शकते आणि ताशी ९५ किलोमीटरच्या कमाल वेगाने धावू शकते. त्यासाठी तिला वन जी मोटर बसविली गेली आहे. मल्टीलिक सस्पेन्शन, आरामदायक राईड शिवाय जेट फायटर लँडींग गिअर तिला देण्यात आले असून तिचा बॅलन्स अतिशय उत्तम आहे. स्कूटरला ऑनबोर्ड ३० सेन्सर असून क्लाऊड कनेक्टीव्हीटी शिवाय गोगोरी मोबाईल अॅपही दिले गेले आहे. हे अॅप स्मार्टस्कूटरशी युजरला नेहमी कनेक्ट ठेवते.

कंपनीने जागोजागी गोस्टेशन लिंकही दिल्या आहेत.यामुळे बॅटरी डाऊन झाली तर रिचार्ज अथवा रिफ्यूएल करण्याऐवजी नवीन चार्ज्ड बॅटरी सहा सेकंदात तेथे बसविता येते. स्कूटरला सर्व्हिसिंगची गरज पडली तर अॅप ती सूचना देऊ शकते. ल्यूक आणि मॅट टेलर या दोघांनी ही स्कूटर तयार केली आहे. यावर्षात कधीही ती बाजारात येऊ शकेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment