मुंबई : बार्सिलोनामध्ये आतापर्यंतचा सर्वात बहुचर्चित स्मार्टफोन ‘एचटीसी वन एम९’ एचटीसी कंपनीने लाँच केला असून सॅमसंगचा अग्रगण्य स्मार्टफोन ‘सॅमसंग गॅलक्सी एस ६ ला शह देण्यासाठी एचटीसी वन एम ९ हा लाँच केल्याचे म्हटले जात आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सॅमसंग आणि एचटीसी या दोन्ही कंपन्या आमनेसामने आहेत.
गॅलक्सीला शह देण्यासाठी एचटीसीने आणला वन एम ९
एचटीसी वन एम९ चे डिझाईन बऱ्यापैकी एम८ शी मिळते जुळते असून किंबहुना एचटीसी वन एम ९ हा एम ८ चे अपग्रेडेड वर्जन आहे. एचटीसीने लक्झरी फोन म्हणून एचटीसी वन एम ९ ग्राहकांना सादर केला असून या फोनची बॉडी पूर्णपणे मेटॅलिक असून गोल्डन ब्लेझ आहे.
वन एम ९ ची वैशिष्ट्ये – २०.७ मेगापिक्सेलचा रेअर कॅम, सेल्फी कॅम ८ अल्ट्रापिक्सेल, २GHz क्वॉर्ड-कोअर स्नॅपड्रॅगन ८१० प्रोसेसर, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटर्नल मेमरी, अपग्रेडेबल अँड्रॉइड ५.० लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, ५ इंच स्क्रीन, फुल एचडी डिस्प्ले, किंमत सुमारे ४० हजार रुपये.